सोमवार, १४ जानेवारी, २०१९

माजी सभापती शिवाजी देशमुख यांच्या जाण्याने राजकीय पोकळी निर्माण झाली.

शिवाजी देशमुख यांच्या जान्याने राजकारणात पोकळी निर्माण झाली. विधानपरिषदेचे सभापती असताना 2013 साली छात्रभारतीच्या वतीने छात्र संसद  आयोजित केली होती या कार्यक्रमाला देशमुख साहेब उदघाटक म्हणून उपस्थित होते. विधान भवनातील अनुभव आणि युवकांनी राजकारणात यावे असे त्यांच्या एकूण भाषणाच्या मांडणीतील आशय होता. राजकीय क्षेत्रातील एक अनुभवी व्यक्ती, मुत्सद्दी राजकारणी, शेती क्षेत्रांतील अनुभवी,अभ्यासु असे अष्टपैलू असे व्यक्तीमत्व शिवाजीराव होते.
      आज काँग्रेस मध्ये जेष्ठ पिढीतील फार कमी लोक आहेत त्यात शिवाजी देशमुख यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.