रविवार, ३१ जुलै, २०१६

छात्र निवडणूक

होय,आम्ही पाठिंबा देतो...

टाटा समाज विज्ञान संस्था मुंबईच्या छात्र संघाच्या होत असलेल्या निवडणूकित स्नेहा मगर यांच्या सामाताधीष्टीत पुरोगामी भूमिकेला पाठिंबा देत त्यांच्या कार्याचा हा आढावा...   




‘टाटा समाज विज्ञान संस्थे’च्या मुंबई केंद्रातील महिला अध्ययन या विषयातील स्नातकोत्तर विभागाच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या स्नेहा मगर या महिला विषयक प्रश्नांवर सातत्त्याने अभ्यासपूर्ण भूमिका घेतआल्याअसून त्या पुणे विद्द्यापिठातून त्यांनी पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी धारण केली असून महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय दैनिक ‘लोकमत’च्या पुणे विभागातही त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केले आहे. तसेच मुक्त पत्रकार म्हणून या विषयावरील त्यांची भूमिका महत्वाची ठरते. एक लेखिका व कवयित्री म्हणूनही साहित्यातून महिलांच्या प्रश्नावर सामाजिक चिंतन घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दाखल विविध समाज माध्यमांनी घेतली आहे. 


आपल्या ‘लोकल’ आणि उध्वस्त दशकाची डायरी’ या सोशल मिडीया वरील काव्य मालिकेतून सातत्त्याने महिलांचे समाजातील स्थान, व्यक्तिगत आयुष्यातील घुसमट व्यक्त करीत त्यातून सातत्त्याने त्याविरुद्ध पेटून उठण्याची आणि सर्वाथाने स्वयंपूर्ण होण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. स्नेहा आपल्या ‘अबोली’ या ब्लॉगच्या माध्यमातून लालीत्यपूर्ण लेखनासोबतच सामाजिक आशयही व्यक्त करतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड, विद्रोही साहित्य संमेलन, पुणे आदी विचारापीठांवरून त्यांनी आपल्या सामाजिक कविता सादर केल्या आहेत. विविध सामाजिक संस्थांसमवेत त्या कार्यरत असून पुढील काळात मानवी अधिकार, सामाजिक न्याय, वंचित विकास, महिला प्रश्नांवर कृतिकार्यक्रम राबवीत त्यासाठी रचनात्मक तथा विधायक मार्गाने जाण्याचा त्यांचा मानस आहे. 


ताजा कलम : 

स्नेहा मगर यांच्या उमेदवारीला छात्रभारती विद्यार्थी संघटनेने पाठिंबा जाहीर केला असून छात्रभारतीचे राज्य संघटक संदिप आखाडे व 'टाटा समाजविज्ञान संस्थे'च्या छात्रभारती शाखेचे अध्यक्ष अशोक हतागळे यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या...